Headlines

आसाम मध्ये भूकंपाचे झटके

गुवाहाटी/वृत्तसंस्था – आसाम मध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या अनुसार सकाळी 07:51 यांनी भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 6.4 रिक्टर स्केल होती. भूकंपाचे केंद्र सोनित पुर जिल्ह्यात होतें. भूकंपाचे झटके आसामची राजधानी गुवाहाटी मध्ये जाणवले. भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध नाही.

भूकंपाने रस्त्याला गेले तडे पाहण्यासाठी – येथेक्लिक करा

पंतप्रधानांची आसामच्या मुख्यमंत्र्यांशी भूकंपासंदर्भात चर्चा; सर्व प्रकारच्या मदतीचे पंतप्रधानांचे आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी राज्यातील काही भागात झालेल्या भूकंपासंदर्भात चर्चा केली.

एका ट्विटमध्ये मोदी म्हणालेः “आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालजी यांच्याशी राज्यातील काही भगात झालेल्या भूकंपांसंदर्भात माझे संभाषण झाले. केंद्राकडून सर्व शक्य मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मी आसाममधील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. ”

Leave a Reply