Headlines

आयकर विभागाचे तामिळनाडू येथे छापे


ए.बी.स.न्युज नेटवर्क

आयकर विभागाने दिनांक 040.3.2021 रोजी छापे मारले ,ज्यात चेन्नईतील दोन कंपन्यांचा समावेश आहे, त्यातील एक तामिळनाडू येथील आघाडीची सराफ पेढी आहे तर दुसरी दक्षिण भारतातील मोठी दागिन्यांची किरकोळ विक्री करणारी कंपनी आहे. ही शोध मोहीम चेन्नई, मुंबई, कोईमतूर, मदुराई, त्रिची,त्रिसूर,नेल्लोर,जयपूर आणि इंदोर अश 27 ठिकाणी जाऊन घेतली गेली.


सराफी पेढीवर घातलेल्या शोधमोहीमेत खात्यांशिवाय रोख विक्री, त्यांच्या शाखांतून बोगस रोख जमा ,आगाऊ विक्रीच्या नावावर बनावट खात्यांतून रक्कम जमा , नोटबंदीच्या काळातील अज्ञात खात्यांत रक्कम जमा, फुटकळ ठेवीदारांकडून आलेली बोगस येणी,आणि न सांगता येणारे वेगवेगळे शेअर्स याचे पुरावे आढळून आले.


किरकोळ विक्रेत्याच्या जागेत सापडलेल्या पुराव्यावरून असे दिसून आले, की करदात्यांनी स्थानिक वित्तपुरवठादारां कडून रोख



रकमेची कर्जे घेतली बांधकाम व्यावसायिकांना रोख रकमेत कर्ज दिले आणि बांधकाम क्षेत्रात रोख रकमेत गुंतवणूक केली ,बेहिशेबी सोने खरेदी केली ,चुकीच्या कर्जावर हक्क सांगितला, जुन्या सोन्याचे सोन्याच्या दागिन्यांत रुपांतर केले आदि गोष्टी केल्या आहेत.


आतापर्यंत या शोधमोहीमेत 1,000 कोटी रुपयांची बेहिशेबी प्राप्ती झालेली आढळून आली आहे. तसेच आत्तापर्यंत बेहिशेबी 1.2 कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे

Leave a Reply