Breaking NewsPolitics

आमचा नगरसेवक हरवलाय?

 

युवकांचे रस्त्यांवरच्या खड्ड्यांची पूजा करत गांधीगिरीने लक्षवेधी आंदोलन

उस्मानाबाद – अनेक वर्षांपासून नगरपालिकेच्या सर्वच सोयी सुविधांपासून प्रलंबित असलेला भाग म्हणून ओम नगर, गणेश नगर(दक्षिण भाग), व जवाहर कॉलनी परिसर आहे.

वारंवार नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देखील कोणीही या भागांच्या मूलभूत समस्यांची दखल घेण्यास तयार नाही. ओम नगर नागरी कृती समिती, जवाहर कॉलनी नागरी कृती समिती व गणेश नगर नागरी कृती समितीच्या वतीने वारंवार याबाबत निवेदन देण्यात आले, या प्रश्नांविषयी नगरसेवक देखील जाणून बुजून कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.

वर्षानुवर्षे हा भाग तसाच मागासलेला आहे. ना व्यवस्थित रस्ता आहे, ना कोणत्याही घराचा सांडपाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

नागरिकांच्या म्हणन्यानुसार नगरसेवक वर्षानुवर्षे निवडणूक झाल्यानंतर फिरकत सुद्धा नाही, काहींना तर नगरसेवक कोण आहे, हे सुद्धा माहित नाही.

हे भोळीभाबडी जनता त्यांना निवडून देते व ते मुजोर लोकप्रतिनिधी गल्लीमध्ये फिरकत सुद्धा नाहीत, प्रत्येकी नगरसेवकांच्या या दुसऱ्या टर्म चालू आहेत. दहा वर्षांच्या काळात त्यांनी फक्त खुर्ची झिजवण्याचे काम केल्याचे त्रस्त नागरिक म्हणत आहेत.

रुग्णवाहिका येण्यापूरता सुद्धा यांनी रस्ता केला नाही, यांना काळजी फक्त निवडणूक व वरिष्ठ नेत्यांची आहे, लवकरात लवकर रस्ते व नाली चा प्रश्न मार्गी लागावा अन्यथा ओम नगर, सुशिला नगर, जवाहर कॉलनी, गणेश नगर (दक्षिण भाग) येथील संयुक्त कृती समितीचे मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील असे सामाजिक कार्यकर्ते तथा विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी नितीश शिंदे, बाळासाहेब परसे, शिवाजी सुरवसे सर, जगदीश शिंदे, पप्पू शेठे, समर्थ शिरसीकर, कृष्णा घोलप, खय्युम सय्यद, प्रतीक मगर, निखिल वाघमारे, राकेश भांडवले, सुमित जानराव, चिलवंत साहेब आदी नागरिक व मंडळाचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!