Breaking News

अभिनेता वरुण धवन लग्नाच्या बेडीत

अभिनेता वरुण धवनने अखेर त्याची लहानपणापासूनची मैत्रीण नताशा दलाल हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. रविवारी अलिबाग येथील एका रिझॉर्टवर या दोघांचा विवाहसोहळा अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थित सर्वांना कोव्हिड-19 चाचणी करणे सक्तीचे होते, अशी माहिती मिळते आहे. यावेळी वरुणने डिझाईनर कुणाल रावलच्या कलेक्शनमधली शेरवानी घातली होती तर नताशासुद्धा मनीष मल्होत्राने खास तयार केलेल्या लहंगामध्ये दिसली. वरुणने त्यांच्या लग्नाचे फोटो ‘Life long love just became official अर्थात ‘आयुष्यभराच्या प्रेमावर शिक्कामोर्तब’ अशा कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!