Breaking Newsyuva sanvaad

अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षितअण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित

स्वावलंबनाचे धडे, तुम्ही दिले हो
ना जातीसाठी, ना धर्मासाठी, शिकवलं फक्त मानवतेसाठी
अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित

स्वाभिमानानं जगायला, तुम्हीचं शिकवलं
गोर-गरीब शेतकऱ्यांची, लेकर शिकू लागली
अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित

कमवा आणि शिका या योजनेने आई-वडिलांच्या डोक्यावरचा ताण कमी झाला
खेड्यातल्या पोरांना शिक्षण दिलं रयतेनं
अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित

शिक्षणाबरोबर तुम्ही समाज प्रबोधन केलं तोच वारसा आम्ही जपतोय,
अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित

              नाव: रविशंकर लता गुरुनाथ जमदाडे
                  मु.पो.तावशी    ता.पंढरपूर जि.सोलापूर 
                  मोबाइल नंबर: 9763632750

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!