Headlines

अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी निमित्त दुधनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

“देशातील विविध समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना अजूनही दलित समाज पाठीमागे राहिलेला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे विविध प्रश्न सोडविले पाहिजेत.आपल्या साहित्याचा माध्यमातू समाज घडविण्याचे काम करणाऱ्या अण्णाभाऊंना भारत सरकारने भारतरत्न सन्मान द्यावा – आयोजन समिति


अक्कलकोट/जयकुमार सोनकांबळे  – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित समाजासह इतर वंचित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून, वाणीतून मांडल्या. समाजाच्या परिवर्तनासाठी त्यांनी आयुष्य झिजवले. आजही दलित समाज मागासलेला आहे. समाजाचे परिवर्तन करण्यासाठी अण्णाभाऊ यांची जन्मशताब्दी सामाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार करून जयंती साजरी करण्यात आली , असे प्रतिपादन दुधनी भिमनगर जयंती आयोजक समितीने  केले आहे.

दुधनी भिमनगरचा वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी प्रारंभी त्यांच्या फोटोस हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या वर्षी १० वी १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी उत्तम निंबाळ, काशीनाथ कौलगी, करण तोरणकर, शरणप्पा सिन्नुर, मालश्री शिंगे, शशिकला निंबाळ, किरण गायकवाड या सह अनेक विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी छायाचिञकार शरणणप्पा लोडेड, युवा नेतृत्व लक्ष्मीपुत्र गायकवाड, सुरेश झाळकी, सामाजिक कार्यकर्ता शांतू लोडेड, शिवा गायकवाड,सैदाप्पा दोडमनी, अभियांञिकी धर्मा शिंगे, पी.बी.ग्रुपचे गुरु सोनकांबळे, भीमा झळकी, बी.आर.ग्रुपचे प्रकाश गायकवाड सर,अनिल गायकवाड सर,निंगप्प निंबाळ,  गुरु गायकवाड, सातलिंग निंबाळ,रवी झळकी, सैदाप्पा गायकवाड,यांचासह मोठ्या संख्यांने विद्यार्थी पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या उत्साहात साजरी करतो. परंतु त्यांचे विचार अंमलात आणत नाही. जोपर्यंत त्यांचे विचार कार्यकर्त्यांना समजणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. त्यामुळे अण्णाभाऊ समजून घ्यायला हवेत. अण्णाभाऊना अभिप्रेत असलेला विचाराने आज त्यांना अभिवादन केले ,  असे प्रतापादन दुधनी भिमनगरचे आयोजन समितीने सांगितले आहे.सुञसंचालन सचिन लोडेड यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *