Headlines

अडचणींना सीमा असते का ?- एक प्रगतशील शेतकरी

बार्शी – भाजीपाला ,तूर ,सोयाबीन कांदा हे किती परवडतात हे शेतकऱ्यालाच माहित असत.या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आधीही कोणी केली नसेल एवढी मोठी  गुंतवणूक करून अर्ध्या एकरामध्ये 160 ×160 चे शेततळे खोदून त्यात मत्स्यपालनाच्या माध्यमातून एक नवा व्यवसाय ,नवी सुरुवात करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या मोठ्या भावाचं स्वप्न अस्मानी संकटामुळे उद्धवस्त झालंय.

हा मत्स्यपालनाचा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो अनेकांचा मार्गदर्शक आणि नवा पायंडा पाडणारा ठरला असता.

लेकरापेक्षा जास्त मायेनं , तळहाताच्या फोडासारखं जपलेलं स्वप्न स्वतः डोळ्यादेखत उद्धवस्त होताना त्याच्या मनाला काय वेदना होत असतील याची कल्पना करवत नाही .कोणत्या शब्दांनी सुरुवात करून त्याची समजूत काढावी कि अजून कष्ट करून उद्याचा दिवस चांगला आणूया …

अशा संकटाच्यावेळी वाटत कि अडचणीतून मार्ग काढून समृद्ध भविष्यकाळाची स्वप्न बघणे हा शेतकऱ्यांसाठी गुन्हाच ठरत असावा काय ? 

एवढा मोठ नुकसान कस भरून निघेल ?

 शासन -प्रशासन बघायला तरी येईल काय ? 

डाव मांडावा कितीदा ?परिस्थितीने तो मोडावा कितीदा ? 

प्रश्न संपणारच नाहीत ! मग उत्तरे तरी शोधावी का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *