Headlines

अखेर 16 तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद



सांगली/सूहेल सय्यद –  सांगली शहरात बुधवार 31 मार्च रोजी बिबट्या पोस्ट ऑफिसच्या मागे पडक्या घरात आढळून आला होता. सकाळी 6 वाजता नागरिकांच्या निदर्शनात आला. यानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी सकाळीच हा परिसर सिल केला. आणि वनविभागाला याची माहिती दिली, आणि परिसरातील लोकांना बाहेर ना पाडण्याचे आवाहन केलं. वनविभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली. आणि परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी जळ्या लावण्यात आल्या. दिवसभर बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला आपले भक्ष बनवले.

पोलिस, वनविभाग, अग्निशामक यांच्या प्रयत्नामुळे तब्बल 16 तासांनी बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडला त्याला बेशुद्ध करून निसर्गाच्या अधिवासात सोडण्यासाठी घेऊन गेले. आणि संपूर्ण सांगलीकरानी सुटकेचा श्वास सोडला. पहिल्यांदा शहरात बिबट्या येण्याची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

    सोशल मीडियावर बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रेस्क्यू कार्यात आणि वाहतूक मोठा अडथळा निर्माण झाला होता. पोलिस प्रमुख, वनविभागाचे अधिकारी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी उपमहापौर धिरज सुर्यवंशी, प्राणीमित्र मुस्ताक मुजावर, इतर जण याठिकाणी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून योग्य त्या उपयाजना करण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *