अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून यांच्या कडून ई -पास ची होळी

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून यांच्या कडून ,ई -पास ची होळी करून राज्य सरकार चा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला

पंढरपूर/-नामदेव लकडे – महाराष्ट्र राज्य सरकारने एसटी महामंडळाची बस प्रवासींना विना पास राज्यभरातून प्रवास करण्यासाठी सुरू केली व खाजगी वाहनधारकांवर ई पास ची सक्ती आणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आनली एकीकडे प्रशासन कोरोणा पासून वाचण्याचे संदेश देत आहे व त्यावर अनेक उपाययोजना ही करत आहे आणि एकीकडे अनोळख्या व्यक्तिबरोबर व लक्षणे माहीत नसलेल्या व्यक्ति बरोबर प्रवास करण्यास परवानगी देत आहे आणि लॉकडाऊन मुळे चार महिने घरातच राहणाऱ्या सदस्यांबरोबर प्रवास करण्यास बंधने घालत आहे.
एकीकडे सरकार आपला महसूल (तिजोरी) भरण्यासाठी जनतेचा जीव धोक्यात घालत आहे आणि एकीकडे गोरगरिबांना करून खाण्यासाठी बंधने आणून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणत आहे.या वाहन धारकांना धंदे नसल्याने यांनी बँका व फायनान्स वाल्यांचे हप्ते कसे फेडायचे आज गाडी चा व्यवसाय करून खाण्यावर तगादा लावून त्यांच्या गाड्या ओढून नेत आहेत अश्या गोर गरीब वाहनधारकांनी जगावे की मरावे हा प्रश्न या वाहनधारकांवर येत असताना या राज्य सरकारने याचे उत्तर यांना द्यावे.
आज अखिल भारतीय छावा संघटनेकडून या सरकारचा आत्ता तरी ई पास जाळून निषेध करण्यात आला आहे जर यापुढे ही खाजगी वाहनांवरील ई पास ची सक्ती त्वरित बंद न केल्यास या ही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राज्य सरकार ला या वेळी देण्यात आला यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व खाजगी वाहन धारक चालक मालक उपस्थित होते.

Leave a Reply